Saturday, April 27, 2013

वाचनातून नजरेत आणि मनात उतरलेला "रारंग ढांग"


नुकतचं रारंग ढांग वाचनात आलं. आणि प्रभाकर पेंढारकरांची कथा मनाला भिडली, नुसती भिडलीच नाही तर खूप दिवस मनात घर करून होती.
लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे, याच्या भोवती फिरणारी हि कथा मानवी भावभावना, निसर्गाचा स्वच्छंदीपणा , आणि आर्मी असे अनेक पैलू उलगड नेते आणि शेवटपर्यंत वाचकाला गुंतवून ठेवते.
मुंबईला असणारी अति आरामशीर नोकरी सोडून विश्वनाथ बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन अर्थात हिमालयात रस्ते बांधणारे आर्मी इंजिनीअरींग कडे वळतो. हिमालयात रस्ते बांधणे हे अत्यंत जिकरीच काम. येथील लहरी निसर्गाचं वर्णन, त्याने मांडलेला उच्छाद इथून कथेला सुरुवात होते. विश्वनाथ च्या मनातील हिमालय आणि त्यानी अनुभवलेला हिमालय यांचं सुरेख वर्णन अधे मध्ये भेटत जात.
आणि मग ओळख होते अवाढव्य अशा "रारंग ढांगाशी". आकाशाला गवसणी घालणाऱ्या उंचच उंच कड्यांना हिमालायात ढांग म्हटलं जात. असा हा रारंग ढांग सतलज नदीच्या दोन्हीबाजूंनी आकाशाला भिडलेला. या रारंग ढांगा तून रस्ता करायचं काम विश्वनाथ वर सोपवलं जात, आणि मग विश्वनाथ चा संघर्ष सुरु होतो हिमालयाशी, मुळातच "ब्लडी सिव्हिलियन्स" चा तिरस्कार करणाऱ्या मेजर बंबांशी, त्याच्या हाताखालील असणाऱ्या लेबर लोकांशी आणि नकळत स्वतःशीच.
विश्वनाथची रारंग ढांगाशी झालेल्या पहिल्या भेटीत त्याच्या मनातील एक वाक्य मला फारच अवडल आणि पटलं देखील - "आपल्या देशात माणसाच्या वेळेला किंमत नाही. आणि त्या पलीकड त्याच्या जीवनाला !"
कथेसोबत पुढे सरकतांना आपली वेगळ्याविध लोकांशी ओळख होत जाते. कॅप्ट्न नायर, मेजर अमर, कॅप्टन मिनू खंबाटा, सर्जेराव गायकवाड, विश्वनाथची मैत्रिण उमा. यातील विशेष भावतो तो मिनू.त्याचं स्वच्छंदी वागण, रसिक मन, बिनधास्त बोलण, वाचकावर तो एक वेगळाच ठसा उमटवून जातो.
अश्या या मिनुच एक वाक्य-"दोस्त, आता खरोखरच चढली. आता ओठांवर शब्द येतात ते डोक्यातून नाही. इथून, हृदयातून ! विशू, जीवन हे जगण्यासाठी आहे. खऱ्या अर्थाने जग. लुटता येईल तेवढा आनंद लूट. देता येईल तेवढ दोन्ही हातानी दे,आजच! उद्दाचं कुणाला माहित? ह्या रंगमंचावर प्रत्येकालाच एक दिवस पडद्याआड जायचं आहे! आणि ह्या बॉर्डर रोडवर तो दिवस कोणत्याही क्षणी उगवण्याची शक्यता असते… "
विश्वनाथ आणि उमाचं फुलत गेलेलं नात सुद्धा कथेला गुलाबी रंग लाउन जात. कथेमध्ये अनेक वळणावर मिळणारे अनपेक्षित धक्के, प्रत्येक प्रसंगाचं, माणसाच्या स्वभावाचं केलेलं अप्रतिम वर्णन, आणि उत्कृष्ट वाक्यासंपदा पुस्तक संपेपर्यंत आपल्याला खिळवून ठेवते.
पण पुस्तक संपल्यावर सुद्धा एक वाक्य जीवनात कायमचं घर करून जात - "जब आदमी मर जाता है, तो उसका क्या रहता है ?"

रारंग ढांग
लेखक- प्रभाकर पेंढारकर
मौज प्रकाशन
वाचलं नसल्यास जरूर वाचा दोस्त हो…


Tuesday, March 22, 2011

शालामाउली (The School)

"Sitarampant Devdhar"
Founder Of DES's New English School, Satara



Ganesh Sabhagruh



Class Room


My Class of 7th


Ajinkyatara Fort: Historical background


My Class Room in 8th


My Class Room in 5th


Our Most Respective : Shivaji Raje



A little corner of school where we used to stand and chit-chat


Prekshagruh (Gathering Stage)


KalaaDalan(Creativity Platform)

Monday, October 4, 2010

कान्हा

श्रावणाच गाण तुझ्या ओठी सुरु होत,
ऊन पावसाशी झिम्मा, मन खेळत बसतं॥

इन्द्रधनुच्या कमानीत तुझी कमनीय काया,
माझ्या मनाला मोहते,तुझी सप्तरंगी छाया॥

ओठी बासरी तुझ्या, तिचे वेडे खुले सुर,
चिंब पावसात भिजे, मन बनून मयूर॥

माथ्यावरी सजे मोरपिसं, जणू पाचूचा खड़ा,
आला बघा गं सयांनो, माझा कान्हा-सावला॥

त्याच्या सोनेरी देहाची, सोन्या सारखी किरणे,
तशी सोनेरी शेवंती, गाते पहाटेचे गाणे॥

माझ्या सावल्या देहात, "सावल्या"चेच चैतन्य,
दर्पणात पाहे मी, माझ्या सावल्या चे बिंब॥

नाही मी राधा, अन मीरा ही नाही
तरी तुझीच आस कान्हा धरून मी राही...
तरी तुझीच वाट कान्हा पाहत मी राही॥

Wednesday, September 8, 2010

मैत्री...

दोन मनांना सांधाणारा पूल म्हणजे मैत्री..
ग्रीश्मातालं शेवंतीच फूल म्हणजे मैत्री..

अवघड वळणावर मारलेला 'कट' म्हणजे मैत्री..
आयुष्यातली गोड्गुलाबी पहाट म्हणजे मैत्री..

तुटत्या तार्र्याकड़े मागितलेली इच्छा म्हणजे मैत्री..
रिकाम्या बेंच वर केलेली प्रतीक्षा म्हणजे मैत्री..

परिक्षेआधी मारलेली नाईट म्हणजे मैत्री..
प्रिंटआउट वरून झालेली फाईटही मैत्रीच..

गालावरचा अश्रु अन खळी सुद्धा मैत्री..
हाडाहुन राकट अन मनाहुन हळवी अशी ...
ही तुझी माझी मैत्री...